बलात्काराच्या गुन्ह्यातील फरा संशयित जेरबंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका संशयित आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्याखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

विजय दशरथ पाटील (वय-२५) रा. भडगाव ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिष्ठर नंबर १९/२०२३ नुसार विजय पाटील याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी विजय पाटील हा भडगाव शहरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार संशयित आरोपीला पकडण्याच्या सुचना पोलीस पथकाला दिली. पथकाने दुपारी ४ वाजता भडगाव बसस्थानक आवारात सापळा रचुन संशयित आरोपी विजय दशरथ पाटील याला अटक केली. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपी विजय दशरथ पाटील याला भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content