रेल्वे कॉलनी परिसरातील महादेव मंदीरात रूद्राक्ष वाटप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश कॉलनी परिसरातील रेल्वे कॉलनी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर व सोमेश्वर महादेव मंदिर येथे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक डॉ. अश्विनभाऊ सोनवणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर २५० भाविकांना सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप करण्यात आले.

शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता आरती झाल्यानंतर रुद्राक्ष घेण्यासाठी रेल्वे कॉलनी परिसरातील तसेच विशाल कॉलनी कृषी कॉलनी विजय कॉलनी श्रीकृष्ण कॉलनी येथील नागरिकांनी गर्दी केलेली होती. या परिसरातील भाविकांना २५० रूद्राक्ष वाटप करण्यात आले.

यावेळी रुपेश माळी, राहुल पाटील, संजू देव, रमेश अमृतकर, रुपेश झवर, मनोहर अमृतकर, रमेश जयस्वाल, भरत पांडे, अविनाश बोरोले, हर्षल सातपुते, मोहित बावस्कर, महेश वाणी, सतीश सोमाणी, राजू राव, धनंजय राव, पवन जैन, सुचित बावस्कर, सुनील चौधरी, गुरव गुरुजी, शेखर देशमुख, प्रदीप जैस्वाल, विलास कोलते, सुनिता गांगुर्डे, लता झवर, सुनिता सातपुते, राजश्री बोरोले, मंगला अमृतकर, कमल बोरोले, प्रमिला कोलते, स्वाती कुलकर्णी, प्रतिभा झोपे, शारदा चौधरी, रंजना पांडे, रेखा वाणी, मीना जयस्वाल, स्वाती झवर, विजया देव, उर्मिला खडके, भारती राव, शुभदा राव, पूजा माळी, विशाखा गांगुर्डे, सपना जयस्वाल, सोनल जैन, दीक्षा सातपुते, स्वाती वाणी ,कोमल बावस्कर, सीमा वाणी ,सुनिता सोमानी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content