किरकोळ कारणावरून तरूणासह आईवडीलांना मारहाण

पहूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात किरकोळ कारणावरून तरूणाला लाकडी दांडक्याने तर त्याच्या आईवडीलांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवेमारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, प्रविण योगीराज दोड (वय-२६) रा. शेंगोळा ता. जामनेर हा तरूण आपल्या आइवडीलांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शेतातील ईलक्ट्रीक वायर पोलवरून टाकत असतांना गावात राहणारे अक्षय भागवत दोड, दिपक भागवत दोड आणि भागवत त्र्यंबक दोड यांनी तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर तरूणाच्या आईवडीलांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या तरूणाला शासकीय रूग्णालयात उपचरार्थ दाखल करण्यात आले. रविवारी १० सप्टेंबर रोजी प्रविण दोड याने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय भागवत दोड, दिपक भागवत दोड आणि भागवत त्र्यंबक दोड रा. शेंगोळा ता.जामनेर यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण चौधरी करीत आहे.

Protected Content