विमा प्रतिनीधींचे उपविभागीय अधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विमा प्रतिनिधींनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांना सादर केले आहे.

एल. आय. सी. ऑफ इंडिया या इन्शुरन्स कंपनीने विमा उतरवितांना विमा धारकाकडून मोठ्या प्रमाणात जी. एस. टी. वसुल करणेत येतो. तो कमी करावा, विमाधारकांना चांगला बोनस मिळावा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युइटीत वाढ करावी अशा विविध मागण्या वरिष्ठ पातळीवर पोहचविण्यासाठी शुक्रवारी संपूर्ण भारत भर निवेदन देण्यात आले. याच अनुषंगाने पाचोरा येथील एल. आय. सी. च्या सॅटेलाईट शाखेच्या विमा प्रतिनिधींनी येथील उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन दिले. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, अव्वल कारकून शरद वाडेकर उपस्थित होते.

पॉलिसी धारकांच्या बोनस मध्ये वाढ करावी, कर्जावरील व्याज व लेट फी वरिल व्याजदर कमी करण्यात यावा, पॉलिसीवरिल जी. एस. टी. रद्द करण्यात यावा, विमाप्रतिनिधींना मेडिक्लेम, ग्रॅच्युइटी मध्ये वाढ करण्यात यावी, आयआरडीएच्या येऊ घातलेल्या जाचक नियमांमध्ये बदल करण्यात यावा. या मागण्यांसंदर्भात आज उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देताना विमा प्रतिनिधी नितीन मोराणकर, विनायक दिवटे, सुजित तिवारी, अनिल कोतकर, जे. बी. पाटील, ए. टी. पाटील, अविनाश सिनकर, निलेश सिनकर, संजय वाणी, सुनील देवरे उपस्थित होते.

Protected Content