ठाकरेंना पुन्हा धक्का : गजानन किर्तीकर शिंदे गटात दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांना धक्का देत त्यांच्या एका सहकार्‍याने एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गजानन किर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. गजानन कीर्तीकर यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल होत एकनाथ शिंदेंची भेट घेतला आहे. त्यानंतर आता कीर्तीकर रविंद्र नाट्य मंदीर येथील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे आता शिंदे यांच्या गटातील खासदारांची संख्या तेरावर पोहचली आहे.

दरम्यान, गजानन किर्तीकर यांच्यासारख्या आणि अतिशय दिग्गज मानल्या जाणार्‍या नेत्याने शिंदे गटात प्रवेश केल्याने उध्दव ठाकरे यांना जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Protected Content