‘गुरुकुल’च्या चिमुकल्यांनी आणली प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात रंगत…

WhatsApp Image 2020 01 27 at 2.56.37 PM 1

धरणगाव, प्रतिनिधी | येथील गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चिमुकल्यांनी धरणगाव नगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात देशभक्तीपर नृत्य , मनोगते व विविध कलागुणांची उधळण करत उपस्थितांची मने जिंकून घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव नगरपालिकेत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नर्सरी , ज्युनिअर केजी व सिनियर केजीच्या चिमुकल्यांनी देशभक्तीच्या भावनेला निरागसपणे स्पर्श केला. या मुलांनी देशभक्तीपर गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. या सांस्कृतिक कार्यक्रमात गुरुकुलचे विद्यार्थी प्रथमेश फुलपगार , कार्तिक असर , निधी पाटील यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या बालमनाला समजलेले देशप्रेम सुंदररित्या व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा उषा वाघ , पुष्पा महाजन , अंजली विसावे यांच्यासह धनपाचे उपनगराध्यक्ष , गटनेते , सर्व नगरसेवक , माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक , धनपाचे कर्मचारी वृंद , गावातील प्रतिष्ठित मान्यवर , विशेष निमंत्रित अतिथी यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती. गुरुकुलच्या कार्यक्रमाला प्राचार्या वैशाली पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रीती भाटीया, कीर्ती बायस, ऐश्वर्या जोशी, तेहजिब खाटीक, ऐश्वर्या निळे, अंकिता सोनवणे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी माधुरी पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार ऐश्वर्या जोशी यांनी केले.

Protected Content