किनगाव स्कूलच्या आदीवासी विद्यार्थिनींना मल्लखांब स्पर्धेत यश  

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा व मल्लखांब असोसिएशन आणी महात्मा गांधी विद्यालय वरणगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हास्तरीय शालेय उर्वरित मल्लखांब स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय वरणगाव येथे सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी संपन्न झाल्यात. या स्पर्धत यावल तालुक्यातील डोणगाव किनगाव रोड वरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थींनींनी या राेप मल्लखांब स्पर्धेत यश संपादन केले.

यात १४ वर्षा आतिल वयोगटात (मुली)दिव्या मेलसिंग बारेला, सविता कलसिंग बारेला तसेच १७ वर्षा आतिल मुलींनमध्ये मनिषा प्रेमसिंग बारेला, ऐंजल थानसिंग बारेला, स्नेहल पिंटिया पावरा व अश्विनी हसरत बारेला या स्कुलच्या आदीवासी विद्यार्थिनींनी यश मिळवलेत या खेडाडूंना नरेंन्द्र भाेई(कोच) व क्रिडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे उत्कृष्ठ असे मार्गदर्शन लाभले.

या मल्लखांब स्पर्धेत विजयी सर्व विद्यार्थिनींचे इंग्लीस मिडीयम स्कूलचे चेअरमन विजयकुमार पाटील, सचिव मनीष पाटील, व्यवस्थापक पुनम पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उपप्राचार्य राजश्री अहिरराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व या विद्यार्थीनीच्या पुढील क्रिडा क्षेत्रासाठीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Protected Content