कोळवद उपकेन्द्रात आरोग्य तपासणी

 

यावल : प्रतिनिधी ।  सावखेडा सीम   प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील उपकेंद्र कोळवद येथे आयुष्यमान भारत  कार्यक्रमांतर्गत एन. सी. डी. शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात ३० वर्षावरील नागरिकांच्या  विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या  उच्चरक्तदाब, मधुमेह व तीन प्रकारचे कर्करोग हे आजार असणाऱ्या कोमाँराबिड रुग्णांना शोधून उपचाराखाली आणण्यात आले.

 

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे,  डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोळवद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे, आरोग्यसेविका मेहमूदा तडवी, आरोग्यसेवक भुषण पाटील  यांनी हे  शिबिर आयोजित केले होते  शिबीरास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

 

शिबीर यशस्वीतेसाठी परिसरातील आशा सेविका छाया वाघुळदे , उषा कोळी , सरला गुंजाळ, हिराबाई तडवी, फरीदा तडवी, सायरा तडवी यांच्यासह  स्थानिक ग्रामस्थ   यांनी  परिश्रम घेतले.

 

Protected Content