‘दलीत वस्ती’चा निधी दुसरीकडे वळविला : जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बोदवड नगरपंचायतीने प्रशासनाची दिशाभूल करून दलित वस्ती चा निधी दुसर्‍याच प्रभागात वळवल्याची तक्रार प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका एकता बी लतीफ शेख यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

एकता बी लतीफ शेख यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. यात नमूद केले आहे की, त्या दलित वस्तीतून निवडून आलेल्या आहेत. असे असतांना सुद्धा प्रभागाला डावलून व दिशाभुल करुन बोदवड नगरपंचायतने दलित वस्तीचा निधी प्रभाग क्रमांक ६ मध्ये वळविला असून जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला आदेश नप/नादवसुयो/आरआर/२८९/२०२३ दिनांक ३१/०३/२०२३ हा रद्द करावा. कारण तसे न केल्यास दलित लोकांचा हक्क डावलला जाईल व तो एक गुन्हा ठरेल. आपण नगरपंचायतीकडे वारंवार विनंती केली तरी राजकीय दबावापोटी सदर चुकीचा व दिशाभुल करुन प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवला. सदर प्रस्तावाची आपण पुनश्चः शहानिशी करावी व संबंधीतांवर योग्यती कार्यवाही करावी व गुन्ह दाखल करावेत अशी तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे या निवेदनात करण्यात आली आहे.

नगरपंचायतीने केली नगररचना विभागाची दिशाभूल

दरम्यान, नगरपंचायतीने गररचना विभाग यांना दिनांक ३०/०१/२०२३ रोजी दिलेले पत्र पुर्णपणे दिशाभुल करणारे व चुकीचे असून दलित निधी इतरत्र वापरुन दलित वस्ती असलेल्या प्रभागावर अन्याय करत असून दलित लोकांचा हक्क डावलण्यात येत आहे. मुख्याधिकार्‍यांनी सदर काम ताबडतोब रद्द करावे अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल व संबंधीतांवर गुन्हे दाखल करावे लागेले यांची कृपया नोंद असा इशारदेखील निवेदनाद्वारे मुख्याधिकारी याना देण्यात आला आहे.

Protected Content