मागण्या मान्य झाल्याने उपोषण घेतले मागे (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | सर्वासाठी घरे २०२२ या धोरणासंदर्भात शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून नमुना ८ ला नावे लावण्यासाठी आदेश मिळावेत या मागणीसाठी भाजपा झोपडपट्टी पुर्नवसन सेल अध्यक्ष विनोद अढाळके यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारण्यात आले होते. यावेळी जळगाव पंचायत समिती कार्यालय अधिकारी यांच्या आश्वसनानंतर व आमदार राजूमामा भोळे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.

 

जळगाव तालुक्यातील आसोदा, ममुराबाद, विटनेर या गावात सरकारी जागेवर तसेच जिल्हा परिषदेच्या जागेवर गेल्या २५/३० वर्षापासून निवासी प्रयोजनासाठी गरीब कुटुंब रहात आहे. तरी सर्वासाठी घरे २०२२ व शासन निर्णयानुसार २५ ते ३० वर्षापासून केलेले निवास प्रयोजनार्थ अतिक्रमण नियामानुकुल करून ५०० चौ.फुट जागा देवून १:५० लाख रु अनुदान आपण घ्यायला पाहिजे होते. गेल्या २०१९ वर्षापासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले, धरणे आंदोलने केली, निवेदने ग्रामविकास मंत्र्यापर्यंत देवून झाली.तरी सुध्दा  उपविभागीय स्तरावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली किंवा कारवाई झाली नसल्याने गरीब कष्टकरी कुटुंबावर अन्याय होत आहे. या अन्यायाविरुध्द भाजपा झोपडपट्टी पुर्नवसन सेलच्या वतीने उपोषण करण्यात आले. मौजे आसोदा ता.जि. जळगाव गावी गट नं.२१४६ व गट नं. १०१६(सरकारी व zp) शासन निर्णयानुसार सदर कुटुंबाचे अतिक्रमण नियमानुकूल करणे कामी प्रपत्र अ मधील माहिती डेटा ऑपरेटर यांनी संगणक प्रणालीवर ऑनलाईन करून ग्रामसेवक यांनी प्रमाणिक केले आहे. तर ५०० चौ.फुट जागा मोजून देण्याचे आदेश दया. नमुना ८ ला लावण्यासाठी आदेश द्या. सर्वासाठी घरे २०२२ या धोरणाची शासन निर्णयानुसार प्रभावी अंमलबजावणी आपण लेखी आदेश द्या. आसोदा गावातील गट नं.२१४६ व गट नं १०१६ येथे रहात असलेल्या गरिबांना शासन निर्णयानुसार ५०० चौ.फुट जागा घ्या व १:५० लाख रु अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. यास जळगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना लेखी आदेश देण्याची मागणी करण्यात आली. उपोषण स्थळाला भाजप जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जळगाव पंचायत समितीच्या कार्यालयीन अधिकारी जुबेदा तडवी यांच्याशी चर्चा केली. याचर्चेत तडवी मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात १७ डिसेंबर २०२१ रोजी शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकीचे उपविभागीय अधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ. भोळे यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना दिली. शासनाने लक्ष घालून लवकरात लवकर घरकुल व शौचालय बांधून द्यावे अशी मागणी आ. भोळे यांनी यावेळी केली. दरम्यान आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते उपोषणकर्त्या महिलांना लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1269832903484685

भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1550034125350167

Protected Content