हितेश पारख यांना ‘डिझाईन आयकॉन’ पुरस्कार प्रदान

जळगाव प्रतिनिधी । येथील युवा वास्तुविशारद हितेश विनय पारख यांना ब्रँड ऑपस इंडियातर्फे उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट अर्चिटेक्चर आणि डिझाइनसाठी ‘डिझाईन आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ब्रँड ऑपस इंडियातर्फे जळगावातील अर्चिटेक्टस अँड डिझाइनर हितेश पारख यांना उत्तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट अर्चिटेक्चर आणि डिझाइनसाठी डिझाईन आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ब्रँड ऑपस इंडियातर्फे दरवर्षी व्यवसाय आणि व्यावसायिकांना देण्यात येणार्‍या पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले.

हितेश पारख हे जळगावातील ख्यातनाम पारख प्लेक्सेस रिअ‍ॅल्टी लिमिटेड या बांधकाम क्षेत्रातील अग्रेसर कंपनीचे प्रमुख विनय पारख यांचे चिरंजीव आहेत. त्यांना डिझाईन आयकॉन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

Protected Content