बोदवड तालुक्यातील तिसरे अपत्य नियमांचे सर्रास उल्लंघन

बोदवड प्रतिनिधी । तालुक्यात तिसरे अपत्य नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून तालुक्यात बहुतेक शासकीय तथा निमशासकीय कर्मचारी यांनी शासनाची फसवणूक केली असून आपल्याला दोनच अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र सादर करून शासनाची चक्क फसवणूक केली आहे.

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास अथवा असल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे.तालुक्यात  सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शासकीय,तथा निमशासकीय कर्मचारी यांसह जिल्हा परिषद तथा माध्यमिक शाळेतील उपशिक्षक शासकीय सेवेत कार्यरत असून ते तिसरे अपत्य नियम पायदळी तुडवत आहेत.

शासकीय सेवेत कार्यरत असलेले शासकीय तथा निमशासकीय कर्मचारी,माध्यमिक तथा जिल्हा परिषद शिक्षक यांनी शासकीय सेवेत सहभागी होण्याआधी लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र सादर केले असून सदरचे प्रमाणपत्र खोटे असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून त्यांचेवर  अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसून दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले बहुतेक लोक नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहे. आज रोजी तालुक्यातील बहुतेक कर्मचारी यांनी आपली नोकरी जावू नये म्हणून आपल्याला दोनच अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र सादर केले असून त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!