धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी महिलेचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील असोदा रेल्वेगेट जवळ एका अनोळखी महिलेला रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत. 

आसोदा गेट जवळ खंबा क्रमांक ४२२/१८ ते २० दरम्यान या महिलेचा मृतदेह आज बुधवार २१ जुलै रोजी ९.३० वाजेच्या सुमारास आढळला. हि महिला ३० ते ३५ वयोगटातील असून कचरावेचक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रेल्वे ट्रॅकमन  योगेश पाटील, प्रकाश कुमावत यांना सदर महिला मृतावस्थेत दिसली. त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती देऊन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनकामी पाठविला. तिला डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू आला असावा असे प्रथमदर्शनी दिसत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!