Home क्राईम अजिंठा रोडवरून मालवाहू गाडीची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

अजिंठा रोडवरून मालवाहू गाडीची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
106

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा रोडवरील सुरभी लॉन जवळून सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या चालकाची दीड लाख रूपये किंमतीची मालवाहू गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. चालकाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, मनोहर ज्ञानदेव पवार (वय-३८) रा. त्रिमुर्ती नगर, सुप्रिम कॉलनी हे खासगी मालवाहू गाडीचे चालक आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मालवाहू (एमएच १९ बीएम ०२४४) क्रमांकाची चारचाकी गाडी आहे. मिळेल ते भाड्याने माल वाहण्याचे काम करतात. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील अजिठा चौफुलीजवळील सुरभी लॉनजवळ त्यांनी मालवाहू गाडी पार्किंगला लावली व कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ते परत आले असता त्यांना मालवाहू गाडी दिसून आली नाही. संपुर्ण परिसर शोधूनही वाहन मिळाले नाही. चालक मनोहर पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound