मराठा समाजातर्फे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक हजार उमेदवार उभे करणार

सोलापुर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठयांना ओबीसीतून आरक्षण दया आणि सगेसोयरे लागू करा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाकडून आंदोलने, सभा घेतल्या जात आहेत. सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोलापुरात झाली. त्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनीही रणनीती ठरवली आहे. त्यानुसार प्रत्येक गावातून तीन ते चार उमेदवार उभे करावेत. तसेच एका मतदारसंघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करण्यात यावेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत यंत्रणा हातळताना आयोगाला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूका बॅलेट पेपरवर घेणे भाग पडू शकते. ही निवडणूक लढविण्याचा खर्च लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.

प्रत्येक वाहनांवर मी मतदार मी उमेदवारी हा फलक समाजाच्या वतीने लावण्यात येणार आहे. जे मतदारसंघ राखीव आहे त्या ठिकाणी इतर समाजाच्या पाठिंबा घेऊन उमेदवार उभे करण्यात येईल. मराठा समाजातर्फे पहिल्या दिवसापासून अर्ज भरायला सुरूवात होणार आहे राज्य शासनाने दिलेला दहा टक्के आरक्षण आगामी निवडणुका बघुन देण्यात आला आहे आणि त्यांचा फायदा केंद्र सरकारच्या नोकऱ्यात होत नाही. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावे ही मागणी सकल मराठा समाजाची आहे.

Protected Content