घरकुल घोटाळा; शिक्षा झालेल्या विद्यमान पाचही नगरसेवक न्यायालयात हजर

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या विद्यमान पाच नगरसेवक आज जिल्‍हा न्यायालयात कामकाजासाठी हजर राहिले होते. तक्रार संदर्भातील दस्तऐवज मिळावे, वकिल लावण्यासाठी मुदतवाढ मिळावी म्हणुन या नगरसेवकांनी विनंती केली. पुढील कामकाजासाठी न्यायालयाने २३ नोहेंबरची तारीख दिली आहे. घरकुल घोटाळ्यात आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह ४८ जणांना धुळे विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, दत्तात्रय कोळी, लता भोईटे व कैलास सोनवणे या पाच नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान, पाचही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक गुप्ता यांनी लावून धरली होती. मंत्रालया पर्यंत तक्रारी केल्यानंतर प्रकरण न्यायालयात पोचले. मात्र ते सभागृह सदस्य नसल्याने त्यांच्या ऐवजी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी १६ मार्च रेाजी दावा दाखल केला. लॉकडाऊन मुळे कामकाज होवु शकले नाही. न्यायालयाने या सर्व नगरसेवकांना आज हजर राहण्याचे आदेश दिले हेाते.

त्यानुसार पाचही नगरसेवक न्यायालयात उपस्थीत होते. आमच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दाव्याचे मुळ दस्तऐवज मिळावे, आम्हाला वकिल लावण्यासाठी मुदत मिळावी अशी विनंती करण्यात आली. त्यावर तक्रारपक्षाचे वकील ॲड. सुधीर कुळकर्णी यांनी आक्षेप घेत ज्या खटल्याच्या निकाला विरोधात आपण उच्च न्यायालयातून जामिन मिळवला. त्याचे दस्तऐवज आपणा कडे नाही. नगरसेवकांच्या आर्जावर कामकाज हेाऊन न्या. जे.जी पवार यांच्या न्यायालयाने पुढील कामकाजासाठी १३ नोहेंबर तारीख दिली आहे.

Protected Content