बोंबला : पुन्हा वाढले गॅस सिलेंडरचे दर !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असतांना पुन्हा एकदा गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने जनतेचा महिन्याचा बजेट बिघडणार आहे.

आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान, यासोबत व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मात्र कपात करण्यात आली आहे. १ जुलै रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत १९८ रुपयांनी कपात केली होती. त्यानंतर आता घरगुती सिलेंडरचे भावही कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र कंपन्यांनी सामान्य ग्राहकांना झटका देत भाव वाढवले. तर कमर्शियल सिलेंडर मात्र अजून आठ रुपयांनी स्वस्त केला आहे.

गॅस सिलेंडरच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्रातील सत्ताधार्‍यांवर टिका केली असतांना देखील भाव सातत्याने वाढतच आहेत. यात हजाराच्या पलीकडे जाऊन आता अकराशेच्या दिशेने भाव झेपावत असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content