ईडीचा दणका ‘या’ मोबाईल कंपनीची ५५५१ कोटींची मालमत्ता जप्त !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजवर राजकारणी, उद्योगपती आणि नोकरशहांना लक्ष्य करणार्‍या ईडीने आता शाओमी या चीनी कंपनीला जोरदार हादरा दिला आहे.

सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीचे नाव घेताच भल्याभल्यांना घाम फुटत असल्याचे आपण पाहिले आहे. अनेक राजकारण्यांभोवती ईडीने फास आवळला आहे. मात्र आता ईडी आपल्या कारवाईची व्याप्ती मोठी करत असल्याचे दिसून येत आहे. आजच बॉलिवुडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हीची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली असून या पाठोपाठ आता शाओमी या चीनी कंपनीला मोठा धक्का दिला आहे.

शाओमी ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे. ईडीने या कंपनीची तब्बल ५५५१ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. फॉरीन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजेच फेमा या कायद्याच्या अंतर्गत असणार्‍या तरतुदींचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खुद्द शाओमी इंडिया कंपनीने या कारवाईला दुजोरा दिला आहे.

Protected Content