वरणगाव शिवारातून ओमनी कारची चोरी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शिवारातील विट भट्ट्यीजवळील मोकळ्या जागेत पार्किंगला लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटनान ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनोद देविदास शिंदे वय ३५ रा. वरणगाव ता. भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते चालक असून ओमनी कार क्रमांक (एमएच २१ सी २६१७) चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची कार ही वरणगाव शिवारातील विट भट्टीजवळ पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ही कार चोरून नेली. त्यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला परंतू कारबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शनिवारी १५ जून रोजी दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे हे करीत आहे.

Protected Content