कांचन नगरातील प्रजापत नगरात तरूणावर चाकू हल्ला करणारा संशयित जेरबंद

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील कांचन नगर येथे प्रजापत नगरातील तरूणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली बुधवारी घडली होती. याप्रकरणी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी शनिपेठ पोलिसांनी संयशीत पप्या उर्फ विशाल पाटील याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की.  शहरातील प्रजापत नगरातील रहिवाशी राजेश रमेश गवळी (वय-३४) हा तरुण किरणा दुकानावर उभा असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल उर्फ पप्या (पुर्ण नाव माहित नाही) याने बुधवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास धारदार चाकूने वार करून जखमी केले होते. याप्रकरणी संशयित आरोपी विशाल उर्फ पप्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहूल पाटील व अनिल कांबळे यांनी शुक्रवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता  संशयीतास आरोपी विशाल उर्फ पप्या पाटील याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

Protected Content