सोशल मीडियावरील वाघाचा व्हिडीओ जळगाव जिल्ह्याचा नाही- वनविभागाची माहिती

जळगाव, प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वेल्हाळा राखेच्या बंडाजवळ व जामनेर तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील वनात वाघ या शीर्षकाखाली वन्यप्राण्यांबाबत सोशल मिडीयावर व्हीडीओ सध्या प्रसारीत होत आहे. सदरचा व्हिडीओ हा जळगाव जिल्हयातील नसून इतर क्षेत्रातील आहे. असे विवेक होशिंग, उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

याबाबत श्री. होशिंग यांनी कळविले आहे की, सदरचा व्हिडिओ हा 9 सेकंदाचा असून त्यामध्ये वाघ मुक्तपणे वावरत असतांना दिसून येत आहे. त्यावरुन वनविभागामार्फत संबंधित क्षेत्राची तपासणी केला असता या क्षेत्रात वाघ दिसून आला नाही. तसेच सदरचा व्हिडीओ हा जळगाव जिल्ह्यातील नसून इतर क्षेत्रातील असल्याने नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये. तसेच वाघ वन्यप्राणी वावरतांना आढळून आल्यास तात्काळपणे वन विभागाच्या टोल फ्री नं. 1926 वर संपर्क साधावा. असे आवाहन वनविभागामार्फत नागरिकांना केले आहे.

Protected Content