Home क्राईम जळगावात टीव्हीएस शोरूम फोडले; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगावात टीव्हीएस शोरूम फोडले; चोरटा सीसीटीव्हीत कैद

0
128

जळगाव प्रतिनिधी । शहरातील टीव्हीएस शोरूम मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून शहरयाप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. 

शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कोंबडी बाजार चौकात योगेश अशोक चौधरी (वय-४५) रा. गणपती नगर जळगाव यांचे पंकज टीव्हीएस शोरूम आहे. याठिकाणी अज्ञात चोरट्याने सोमवारी ६ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास गच्चीवरील चायनल गेटच्या लिप्टच्या माध्यमातून कुलूप तोडून आत प्रवेश करत शोरूमच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले. लॅपटॉप आणि मोबाईल चोरून नेला. दरम्यान,  लोखंडी लॉकरमध्ये रोकड असल्याचा अंदाजानुसार त्याने लोखंडी लॉकर तोडले. परंतू त्यात चेक बुक शिवाय काहीही हातात आले नाही. तसेच मुख्य कार्यालयात सामान अस्तव्यस्त दिसून आला. यात लेनेव्हा कंपनीचा लॅपटॉप आणि मोबाईल अश्या दोन वस्तू चोरीला गेल्या. हाप्रकार सर्व सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आज सकाळी ९ वाजता कर्मचारी कामावर आले तेव्हा कार्यालयात चोरी झाल्याचे समोर आले. शहर पोलीसांना चोरी झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्या पोलीस कर्मचारी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound