जुना वाद : दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटविली; दोघांवर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाला मारहाण करून, त्यानंतर त्याच्या ओळखीच्या मित्राची दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या कोमल विनोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी शिवा जाधव या तरुणाला जुन्या वादातून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर, २२ मे रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेली सचिन राठोड यांची दुचाकी (क्रमांक उपलब्ध नाही) संशयित किरण शामराव चितळे आणि रवी राठोड (दोघे रा. सुप्रिम कॉलनी) यांनी पेट्रोल टाकून जाळून टाकली.

या गंभीर प्रकारानंतर कोमल जाधव यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी किरण शामराव चितळे आणि रवी राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करत आहेत. जुन्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला आहे.