अरे बापरे ! मानेवर मुंग्या असल्याचे सांगत ५ लाख रूपये ठेवलेली पिशवी लांबविली

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुमच्या मानेवर मुंग्या आल्या आहे असे सांगून लक्ष विचलीत करून अज्ञात दोन जणांनी एकाच्या हातातील पाच लाखांची रोकड ठेवलेली पिशवी घेवून लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, केशरलाल मोतीलाल पाटील (वय-४५) रा. गरताड ता. चोपडा जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी ३१ मे रोजी सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास ते चोपडा शहरातील एसबीआय बँकेत आले. त्यांनी चेकद्वारे त्यांनी त्यांच्या खात्यातून ५ लाख रूपये काढून त्यांच्याजवळ कापडी पिशवीत ठेवली. पैसे घेवून बँकेच्या बाहेर त्यांच्या दुचाकीजवळ उभे असतांना दोन अनोळखी व्यक्ती  आले. त्यांनी सांगितले की, तुमच्या मानेवर मुंग्या आहेत असे सांगून केशरलाल पाटील यांना पाण्याचा जग आणला. केशरलाल पाटील हे मानेवर पाणी टाकत असतांना लक्ष विचलित करून अज्ञातांनी त्यांच्या हातातील ५ लाख रूपयांची पिशवी घेवून दुचाकीवरून पसार झाले. पाच लाख रूपयांची रोकडची पिशवी लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतू तोपर्यंत दोन्ही भामटे लाखोंची रोकड घेवून पसार झाले होते. याप्रकरणी केशरलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे करीत आहे.

Protected Content