आव्हाणे येथील तरूणाच्या खूनातील दोन्ही संशयितांना अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू व्यवसायाच्या वादातून आव्हाणे येथील भावेस उत्तर पाटील या तरूणाचा चॉपरने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. या गुन्ह्यातील फरार दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक केली आहे.

मनिष नरेंद्र पाटील रा. अहमदाबादवाडा आव्हाणे ता.जि.जळगाव आणि भूषण रघुनाथ सपकाळे रा. डॉ. आंबेडकर पुतळ्यामागे खेडी खुर्द ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या देान्ही संशयित आरोपींची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “भावेश उत्तम पाटील (वय-३२) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव ह.मु.निवृत्ती नगर,जळगाव हा आपल्या आई, पत्नी आणि मुलीसह दोन वर्षांपासून वास्तव्याला होता. भावेश पाटील हा मनिष पाटील आणि भुषण सपकाळे यांच्यासोबत वाळूचा व्यवसाय करत होता. दरम्यान भावेश पाटील याने वाळू व्यावसायात चांगला बस बसविला होता. या रागातून दोघांनी भावेशला मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास निवृत्ती नगरातील बंधन बँकेजवळ बोलावून बेसावधपणे असतांना दोघांनी चॉपरने २४ वार करून भावेशचा निर्घृण खून केला. घटना घडल्यानंतर दोन्ही मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुण्यात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ राजेश मेंढे, पो.ना. संतोष मायकल, चालक मुरलीधर बारी असे पथक पुण्याला रवाना झाले. पुण्यातील तळेगाव रस्त्यावरून संशतय आरोपी भूषण सपकाळे आणि मनिष पाटील यांना अटक केली. दोघांना पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content