ट्रॅक्टरच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

शेगांव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील मुरारका शाळेच्या वळण रस्त्यावर ट्रॅक्टरच्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, आनंद अशोक गवई (वय २६) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी २५ मार्च रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ही घटना मुरारका शाळेजवळ वळण रस्त्यावर झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थळावर शेगाव शहर पोलीस पोहचून ट्रॅक्टर हे पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. तर अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. रुग्णालयाकडून रात्री सव्वाअकरा वाजता मिळालेल्या मेमो वरून शेगाव शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेकॉन्स्टेबल संजय करुटले हे करीत आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!