अमळनेर मतदार संघात उल्लेखनीय विकास कामे

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील जिराळी येथे अत्याधुनीक व्यायामशाळा इमारत, व्यायाम साहित्य, मारुती मंदिराचा सभामंडप आदी विकास कामांचे लोकार्पण तसेच काँक्रीट रस्त्याचे भूमीपूजन आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.


आ. चौधरी यांनी सुरवातीपासूनच अमळनेर मतदार संघात असलेल्या पारोळा तालुक्यातील ४१ गावांवर विशेष लक्ष देऊन समान न्यायाची भूमिका घेतलेली आहे. सुमारे ५५ लाख निधीतून जिराळी ते इंधवे या दोन गावांना जोडणारा पूल, १ कोटी २५ लाख निधीतून जिराळी ते बहादरपूर रस्ता, तसेच जिराळी येथे हायमॅक्स लॅम्प, नाला खोलीकरण आदी कामे आमदारांनी केली असून याव्यतिरिक्त बोरी नदीवरील बंधाऱ्यांसह इतर गावांमध्ये देखील उल्लेखनीय विकासकामे झाली आहेत. यामुळे ग्रामस्थांनी यावेळी समाधानाची भावना व्यक्त करत आ. चौधरी यांचे विशेष आभार व्यक्त केले. याप्रसंगी गटनेते प्रवीण पाठक, मा. उपनगराध्यक्ष आबु महाजन, नगरसेवक बाळासाहेब संदानशीव, पंकज चौधरी, जिराळीचे सरपंच संभाजी पाटील, भोलाने सरपंच चतुर पाटील, पिंपळकोठे सरपंच महेंद्र पाटील, माजी सरपंच चंद्रकांत खैरनार, गोविंदा पाटील, संभाजी पाटील, रमेश पाटील, नामदेव पाटील, गोविंद पाटील, बन्सीलाल पाटील, पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, योगेश चौधरी, किशोर शिंदे, मोतीराम बोरसे, निंबा पवार, बटाऊ खैरनार, प्रवीण पाटील, किशोर पाटील, भिवन पाटील, कैलास पाटील, सुभाष पाटील, मोहन पाटील, भरत पाटील, गणेश पाटील, बापू पाटील, निंबा भिल, भैय्या पाटील, भोला पाटील, बाळू पाटील, प्रल्हाद पाटील, संजय पाटील, प्रकाश पाटील, लोटन सोनवणे, अतुल बोरसे, यशवंत पाटील, दिलीप पाटील आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दरम्यान आमदारकीचा आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक असताना अनेक कामे शासन दरबारी प्रस्तावित असून लवकरच त्यास मंजुरी मिळून वर्षभरात ती पूर्ण झालेली असतील, अशी भावना आ चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.

Add Comment

Protected Content