बीबीसीवर भारतात बंदी नाहीच : सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बीबीसी ही वृत्तसंस्था हिंदूविरोधी असल्याने यावर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.

हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता आणि बिरेंदर कुमार सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी बीबीसी म्हणजेच ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली होती. यात अलीकडेच बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाचा उल्लेख करण्यात आला होता. ही डॉक्युमेंटरी म्हणजे हिंदू विरोधी कटातील एक भाग असल्याचा आरोप यात करण्यात आला होता. ही वृत्तसंस्था हिंदूविरोधी अजेंडा राबवत असल्याने यावर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने ही मागणी साफ फेटाळून लावली. संबंधीत रिट याचिका पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यात कोणतीही योग्यता नाही, त्यामुळं ती फेटळली जात असल्याचे न्यायमूर्तींनी निकालात नमूद केले आहे.

Protected Content