अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एकाची पावणे सहा लाखांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारे ५३ वर्षीय प्रौढ व्यक्तीला अनोळखी नंबरवरून आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाख ८१ हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत गुरूवार ९ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जळगाव सायबर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ५३ वर्षीय व्यक्ती हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान ४ फेब्रुवारी रोजी त्यांना व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यात त्याने व्हिडिओ कॉल करून अश्लिल व्हिडीओ पाठविले. त्यानंतर त्यांची काम भावना जागृती करून त्यांच्याकडून अश्लील व्हिडिओ काढून घेतले. त्यानंतर ते व्हिडिओ युट्युबवर टाकून व्हायरल करण्याची धमकी देत प्रौढ व्यक्तीकडून वारंवार पैशांची मागणी केली. त्यांनी आतापर्यंत प्रौढ व्यक्तीने ५ लाख ८१ हजार रुपये विविध बँकेच्या माध्यमातून दिले. पुन्हा परत इतर नंबरवरून आयपीएस अधिकारी ओमप्रकाश व मंजित सिंग असल्याचे नाव सांगून पुन्हा पैशांची मागणी केली. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रौढ व्यक्तीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात दोन मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहे.

Protected Content