अमळनेर तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या अध्यक्षपदी भागवत पाटील तर उपाध्यक्षपदी भिका धनगर

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांची सहकारी संस्था असलेल्या तालुका फ्रुटसेल सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया तालुका सह निबंधक तथा अध्यासी अधिकारी एस. पी. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. यात अध्यक्षपदी भागवत पाटील तर उपाध्यक्षपदी भिका धनगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

याप्रसंगी माजी चेअरमन बाळासाहेब पाटील फफोरेकर , माजी व्हाईस चेअरमन सुशीलकुमार पाटील निंब , माजी चेअरमन शामकांत पाटील गोवर्धन,संचालक युवराज आत्माराम पाटील बोहरे ,अरुण श्रीराम पाटील कन्हेरे ,भागवत पंडित पाटील पाडळसरे,प्रताप आत्माराम पाटील फाफोरे ,अनिल भीमराव पाटील (बोहरे ),कुलदीप कृष्णा पाटील कंडारी ,हिलाल छन्नू सैदाने (निम) ,भिका हिरामण धनगर (निम ),मंगलाबाई शिवाजी पाटील (बोहरे ), सुवर्णा अनिल पाटील ( बोहरे ) ,तज्ञ संचालक सुनील कान्हैयालाल काटे (कोळपिंप्री), आमंत्रित संचालक संदीप लोटन चौधरी( निम ) हे संचालक या बैठकीला उपस्थित होते , यात सूचक म्हणून शामकांत पाटील यांनी तर अनुमोदन बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

या निवडीबद्दल नवनिर्वाचित चेअरमन भागवत पाटील व व्हाईस चेअरमन भिका धनगर यांचे अमळनेर तालुक्यातुन आमदार अनिल पाटील , माजी आमदार साहेबराव पाटील ,माजी आमदार स्मिता वाघ , माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागिय कार्याध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील ,विकास सोसायटीचे चेअरमन मंगल पाटील ,व्हाईस चेअरमन शत्रुघ्न पाटील ,राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष विकास पाटील ,राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष भूषण पाटील ,संदीप पाटील , पाडळसरेचे माजी सरपंच रमेश पाटील , माजी उपसरपंच रवींद्र पाटील ,पंडित पाटील , ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे गोपाल कोळी यांनी विशेष अभिनंदन केले आहे

Protected Content