कणकवली (वृत्तसंस्था) कणकवली विधानसभेच्या जागेवर नितेश राणे भाजपाकडून लढणार आहेत. विशेष म्हणजे पक्षप्रवेश न करताच भाजपा त्यांना एबी फॉर्म देणार असल्याचे कळते.
नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. त्यामुळे राणेंसमोर आव्हान उभे राहीले आहे. २ ऑक्टोबरला आपण भाजपा प्रवेश करु असे राणेंनी नुकतेच जाहीर केले होते. पण आज तसा कुठलाही कार्यक्रम दिसून येत नाहीय. परंतू दुसरीकडे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतल्यानंतर नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवरून ‘काही तास बाकी’ असे ट्विट केले. त्यामुळे या बैठकीत नेमके काय झाले? हे स्पष्ट झाले आहे.