बापरे…जिल्ह्यात नवीन १९ कोरोना बाधीत आढळले; १८ अमळनेरचे १ भुसावळचा !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा १९ कोरोनाबाधीत आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेली आहे. यातील तब्बल १८ रूग्ण अमळनेरचे असून एक भुसावळचा आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील अठरा व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 85 इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये अमळनेर येथील तब्बल १८ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने हे शहर हॉटस्पॉट झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. यामुळे अमळनेर तालुक्यातील रूग्णांची संख्या आता तब्बल ४१ इतकी झालेली आहे. तर याच्या खालोखाल भुसावळ येथील रूग्णांची संख्यादेखील वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. भुसावळ मधील रूग्णांची संख्या आता १५ इतकी झालेली आहे. भुसावळात दुपारी आढळून आलेला रूग्ण हा गंगाराम प्लॉट भागातील असून रात्री पॉझिटीव्ह झालेला रूग्ण हा खडका रोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती भुसावळ येथील सूत्रांनी दिली आहे.

आज दुपारी आलेल्या रिपोर्टमध्ये चार रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले होते. या पाठोपाठ १९ रूग्ण कोरोना बाधीत आढळून आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी २३ रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याचे गांभिर्य अजून वाढले आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content