कोरोना चाचणीआधीच पलायन करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा

रावेर प्रतिनिधी । येथील शासकीय रूग्णालयात कोरोनाचे संशयित म्हणून दाखल करण्यात आल्यानंतर स्वॅब चाचणीसाठी सँपल न देता पलायन केलेल्या सात जणांविरूध्द येथील पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असून ठिकठिकाणच्या शासकीय रूग्णालयांमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या अनुषंगाने येथील समाज कल्याण खात्याच्या हॉस्टेलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यात कोरोनाच्या संशयितांचे स्वॅब सँपल घेऊन ते चाचणीसाठी पाठविले जात आहे. मात्र काही संशयित म्हणून दाखल झालेले रूग्ण चाचणीसाठी सँपल देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने येथे कोरोनाचे संशयित म्हणून दाखल झालेल्या सात जणांनी चाचणीसाठी सँपल देण्याआधीच रूग्णालयातून पळ काढल्याचे दिसून आले आहे. या अनुषंगाने रावेर पो स्टे भाग ६ गुरनं ४४/२० भादंवि कलम १८८,२६९,२७० सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कलम ५१प्रमाणे सुनिता राजू सोनवणे वय ३४, देवेश राजू सोनवणे वय- १२, विवेक राजू सोनवणे वय- १०, विकास देवीदास महाले, संगीता किरण महाले वय- ३५, समिक्षा किरण महाले वय- १९ आणि चेतन किरण महाले (सर्व रा. निंभोरा ता, रावेर) या सात जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. महेंद्र सुरवाडे हे करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content