शांतिगिरी महाराजांनी जळगाव लोकसभा लढवावी ( व्हिडीओ )

चाळीसगाव प्रतिनिधी । शांतिगिरी महाराज यांनी जळगाव लोकसभेतून उमेदवारी करावी अशी मागणी त्यांच्या भक्त परिवारातर्फे करण्यात आली आहे.

वेरूळ येथील संत जनार्दन देवस्थानाचे गादीपती शांतिगिरी महाराज यांच्या भक्त परिवारातर्फे आज शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. वेरूळ येथील जय बाबाजी भक्त परिवाराचे साधक विठ्ठल महाराज व भक्त परिवार यांचे वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यात ही माहिती दिली आहे.राजकारण भ्रष्ट झाले असून सर्वसामान्य माणूस राजकारणापासून दुरावला जात असल्याने या राजकारणाचे शुद्धीकरण व्हावे यासाठी आम्ही नऊ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच औरंगाबाद जळगाव नाशिक धुळे जालना लातूर पुणे अमरावती नगर मध्ये हे अभियान राबवित आहोत. याद्वारे मतदान न करणार्‍या मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचे काम हे आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षास १७ कोटी मतदान मिळाले तर सर्व व विरोधी पक्षांना अकरा कोटी व सत्तावीस कोटी मतदारांनी मतदानात भाग घेतला नाही. आम्ही भाग न घेतलेल्या या २७ कोटी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करणार आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या परिवाराची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात बाबाजींनी उमेदवारी करावी अशी आमची इच्छा आहे असेही याप्रसंगी सांगण्यात आले.

शुद्ध चारित्र्य व निष्काम कर्मयोगी असलेल्या बाबाजीं उमेदवारी करून राजकारण शुद्धीकरणासाठी प्रयत्न करावेत अशी आमची इच्छा असल्याचे या भक्त परिवारा मार्फत यावेळी सांगण्यात आले. याच वेळी सर्व भक्त परिवाराचा एकंदरीत बोलण्याचा सूर पाहता भाजपा ने त्यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी असल्याचे निदर्शनास आले. या पत्रपरिषदेत जय बाबाजी भक्त परिवाराचे स्वामी विठ्ठल महाराज, अर्जुन महाराज, प्रशांत कुमावत चाळीसगाव नारायण कुमावत चाळीसगाव, अमरसिंह पाटील पाचोरा, बोरसे आप्पा चाळीसगाव, नाना ठाकरे धरणगाव, बंडू राजपूत भडगाव, अर्जुन पाटील पाचोरा, संजय पाटील एरंडोल, विश्‍वंभर सिसोदे जामनेर, अरुण बोरसे अमळनेर, अनील निंबोळकर जळगाव, अभिमन्यू पाटील आदी उपस्थित होते

पहा : शांतिगिरी महाराजांचे भक्त नेमके काय म्हणतात ते !

Add Comment

Protected Content