एकनाथराव खडसे अपक्ष निवडणूक लढणार? ; मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला सोडण्याच्या हालचाली

khadse e1550572684596

जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या उमेदवारांची पहिली १२५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव नाहीय. त्यामुळे हा मतदार संघ शिवसेनेला सोडण्याच्या हालचाली मुंबईत गतिमान झाल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पहिल्याच यादीत खडसे यांचे नाव नसल्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघ शिवसेनेला देण्याचा निर्णय भाजपने घेतल्याची चर्चा आहे. दुसरीकडे खडसेंनी शक्तिप्रदर्शन करत एक अपक्ष व एक भाजपतर्फे असे दाेन उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी संतापलेल्या खडसे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे. मुंबईत सुरु असलेल्या चर्चेनुसार मुक्ताईनगर मतदारसंघ सेनेला साेडण्यास भाजप श्रेष्ठींनी संमती दर्शवली असल्याचे कळते. सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटलांना तेथील उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे खडसे आता बंड करून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारी करू शकतात. खडसे यांनी अपक्ष भरलेला फॉर्म याचेच संकेत असल्याचेही बोलले जात आहे.

Protected Content