महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील अशोक वाईन समोरून ट्रकच्या बाजूला दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ३० जुलै रोजी  सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकजवळ असलेल्या अशोक वाईन समोर असलेल्या महामार्गावरून ट्रक जात असतांना दुचाकी क्रमांक (एमएच १८ एव्ही ५३२४) ने जात असलेल्या दुचाकीस्वार ट्रकवर धडकला. यात दुचाकीस्वार अनिल सुरेश चव्हाण हा जखमी झाल्याची घटना रविवारी ३० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ट्रक चालक सजाद अहमद (वय-२३) रा. जम्मु काश्मिर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

Protected Content