बंदुकीने ठार मारण्याची धमकी; बियरची बाटली मारल्याने तरूण जखमी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाचा वाद उरकून काढत बंदूकीने मारून टाकण्याची धमकी देत हातातील फुटलेली बिअरची बाटली फेकून मारल्याने तरूणाला गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकाजवळील वाईन शॉप जवळ रविवारी ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रेल्वे स्थानक जवळील वाईन शॉप दुकानावर रविवारी ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तनवीर शेख रहीम शेख (वय-२०) रा. मनिषा पार्क, अब्बु बकर कॉलनी, जळगाव हा तरूण उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अकील शेख अजगर उर्फ भुऱ्या आणि शकील (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी तनवीर शेख याला शिवीगाळ करून दमदाटी करू लागले. त्यानंतर शकीलने तनवीर शेखला पकडून धरले तर अकील शेख याने हातातील फुटलेली बिअरची बाटली मारली. यात तनवीर शेख रहिम शेख हा जखमी झाला. त्यानंतर अश्लिल शिवीगाळ करून बंदूकीने जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तनवीर शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विरेंद्र शिंदे करीत आहे..

 

Protected Content