बाबांच्या विमानात पेंग्वीनची मजा ! : नितेश राणेंचा निशाणा

मुंबई प्रतिनिधी | पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्कॉटलंड दौर्‍यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी एका व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर एका ट्विटच्या माध्यमातून टिका केली आहे. यात एक व्यंगचित्र शेअर करून पेंग्विनची स्कॉटलंड वारी, शेतकरी उपाशीपोटी काम करी असे आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.या व्यंगचित्रामध्ये आदित्य ठाकरे हे विमानात बसलेले दाखवले आहेत. ते विमानातून खाली पाहात आहेत. तर खाली चार व्यक्ती दाखवण्यात आले आहेत, त्यामध्ये एक शेतकरी आहे, दुसरा एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आहे, तर तिसरा व्यक्ती हा डॉक्टर असून, चौथा एसटी कर्मचारी आहे. या व्यंगचित्रामध्ये हे सर्वजण हात जोडून आपल्या समस्या सोडवण्याची विनंती करताना दिसत आहेत. हे व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करताना राणे यांनी बाबांच्या विमानात पेंग्विनची मजा, सामान्य जनता भोगतीये महाविकास आघाडीची सजा असे म्हणत आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याबाबत टीका केली आहे.

नितेश राणे यांनी अलीकडच्या काळात महाविकास आघाडी सरकारबाबत अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. यात त्यांनी सातत्याने ठाकरे घराण्याला टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना टार्गेट केल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

Protected Content