सुप्रीम कोर्टाला मिळणार पहिले समलैंगीक न्यायाधिश !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजीयमने सौरभ कृपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बनविण्याची शिफारस केली असून या माध्यमातून देशाला पहिल्यांदाच समलैंगीक न्यायाधिश मिळणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील सर्वात लक्षणीय म्हणजे ते भारतातील पहिले समलैंगिक न्यायाधीश होऊ शकतात. हा निर्णय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातही उदाहरण ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पहिल्यांदाच समलैंगिक न्यायाधीश करण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्ती झाल्यास ते भारतातील पहिले समलिंगी न्यायाधीश असतील. सौरभ कृपाल यांनी आधीच जाहीरपणे आपण समलैंगीक असल्याची घोषणा केली असून कलम-३७७ रद्द करण्यासाठी त्यांनी लढा दिला आहे.

सौरभ कृपाल हे न्यायमूर्ती बीएन कृपाल यांचे पुत्र आहेत जे मे २००२ ते नोव्हेंबर २००२ पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे ३१ वे मुख्य न्यायाधीश होते. सौरभ कृपालने दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून भौतिकशास्त्रात बीएससी ऑनर्स केले आहेत.नंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर पदवी मिळवली. भारतात येण्यापूर्वी त्यांनी काही काळ जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र संघासाठी काम केले आहे. २०१७ पासून सौरभ कृपाल यांना सुप्रीम कोर्टात न्यायाधिश बनविण्याची शिफारस करण्याचे प्रयत्न सुरू होते. चार वेळेस त्यांचे नाव समोर आले तरी यावर मतैक्य झाले नव्हते. मात्र अलीकडेच ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाला सर्वसंमती प्रदान करण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती ही लिंग समानतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जात आहे. एलजीबीटी समुदायातर्फे याचे स्वागत करण्यात आले आहे.

Protected Content