मोदी सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ; पेट्रोल, डिझेल ३ रुपयांनी महागणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी महागणार आहे.

 

केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क करामध्ये तीन रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत असताना जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रतिलिटर पेट्रोलवर रस्ते उपकरात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाचे दर वाढणार असल्यानं वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.

Protected Content