प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी संघटनाचा ‘चलो दिल्ली’ आंदोलन

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत. मागण्या पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात नाराजी पसरली आहे. शेतकऱ्यांनी आता प्रलंबित मागण्यांसाठी दिल्ली चलो मार्च पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हरियाणा-पंजाबच्या सीमेवर ग्रस्त वाढवण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्र सरकारवर चांगलाच दबाव आल्याचं दिसून येतंय. आंदोलनामुळे सरकार चांगलच सक्रीय झालेलं आहे. सरकारने तीन मंत्र्यांना चंदीगडला पाठवण्याची तयारी केल्याची माहिती आहे. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी हे तिघे चर्चा करणार आहेत. सोबतच ‘दिल्ली चलो’ मार्चला स्थगित करण्यासाठी शेतकऱ्यांनी मनधरणी केली जाईल.

मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मंत्री नित्यानंद राय आणि मंत्री अर्जुन मुंडा यांना शेतकऱ्यांच्या संघटनांशी चर्चा करण्यास पाठवलं आहे. हे तीन मंत्री चंदीगडकडे रवाना झाले आहेत. १३ फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी मंत्र्यांचं शिष्टमंडळ आंदोलकांच्या भेटीसाठी जाईल. मंत्र्यांची शिष्टाई फळाली येईल का, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Protected Content