मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्रातील सत्तानाट्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची याचिका सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली असून यावर उद्या साडेअकराला सुनावणी होणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यातील फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी गैर प्रकारे झाल्याचा आरोप करून या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका सादर केली आहे. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली असली तरी रात्री सुनावणीस नकार दिला आहे. आता यावर उद्या सकाळी साडेअकराला सुनावणी होणार आहे. या तिन्ही पक्षांनी रविवारीच बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली आहे. मात्र यावर आता उद्या सुनावणी होणार असल्याने हे सध्या तरी शक्य नाही. तथापि, लवकराच लवकर बहुमत सिध्द करण्याची मागणी या पक्षांनी केली आहे.