फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश संत समितीचे महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २० व २१ ऑक्टोबर रोजी वडोदा येथील श्री निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटर या ठिकाणी घेण्यात येत आहे असे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समितीचे संरक्षक अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश स्वामी अमृतानंदजी महाराज, प्रदेशाध्यक्ष श्रद्धेय श्री गोपाल चैतन्य जी महाराज, महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती जी, स्वामी योगी दत्ता नाथजी महाराज, ह भ प संतोषानंदजी महाराज, स्वामी विशुद्धानंद जी महाराज स्वामी अनंत प्रकाश दासजी महाराज, गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे श्री श्याम चैतन्य जी महाराज यांची उपस्थिती होती.
दि. २० व २१ रोजी महाराष्ट्रातील सर्व धर्म संप्रदायाचे प्रमुख संत महंत या चिंतन बैठकीला उपस्थित राहणार आहे. यात देव, देश, धर्म टिकवण्यासाठी तसेच भारतीय संस्कृती अबाधित राहण्यासाठी जात, पात, धर्म बाजूला सारून सर्व संप्रदायाच्या संतांनी एकत्र येऊन अखिल भारतीय संत समितीच्या छत्रछायेखाली कार्य करण्यासाठी भारतभरात ठीक ठिकाणी संतांच्या अशा चिंतन बैठकीचे आयोजन केले जात आहे. त्याची सुरुवात वढोदा फैजपूर येथून करण्यात येत आहे. सामाजिक राजकीय सांस्कृतिक वातावरण विचलित झाल्याने महाराष्ट्राची जी प्रतिमा मलीन झाली आहे त्यासाठी तसेच हिंदू धर्माच्या एकत्रिकरणासाठी संतांनी एकत्र येऊन निश्चित अशी भूमिका घेण्यासाठी या चिंतन बैठकीचा उद्देश्य असल्याचे संतांनी पत्रकार परिषदेत सांगितले.