करणखेडा येथे गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा उत्साहात

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । करणखेडा येथे उन्नती संस्था तर्फे गुरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच कै. ज्ञानेश्वर गुरव यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील शांताराम गुरव व गणेश गुरव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन शांताराम गुरव,नथ्थु गुरव (मारवड)वामन गुरव (नंदुरबार) यांनी केले. तर प्रतिमा पुजन,मुबंई येथिल पोलीस निरीक्षक पद्माकर देवरे,उन्नती संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश गुरव,सुमनबाई गुरव (करणखेडा),श्रीमती छायाताई गुरव (सुरत) यांनी केले. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रात गुण संपन्न प्राप्त विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते गुण गौरव सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला. यावेळी गुणवंत विद्यार्थींसाठी स्कुल बॅग पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी त्यांच्याकडून भेट दिली. तसेच उन्नती संस्थेतर्फे माधवराव गुरव यांचा मुलगा स्व.हर्षदच्या स्मरणार्थ संगणक, प्रिंटर,स्पीकर असा विविध वस्तू भेट दिले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये

– विद्यार्थी उपस्थिती लक्षणीय होती.

– प्रथमच संपूर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण लाईव्ह करण्यात आले.

– गुरव समाज उन्नती संस्थेच्या वेब साईडचे आज उदघाटन करण्यात आले.

– उन्नती संस्थेचे प्रातिनिधिक

पदाधिकारी सोडले तर कुणीही व्यासपीठावर बसले नव्हते, कोणत्याही पदाधिकारी यांनी सत्कार स्विकारला नाही. समाजातील मान्यवर, अधिकारी RFO, RTO, PSI, सुभेदार (आर्मी), डॉक्टर, नगर पालिका सभापती, एकविरा माता मंदिराचे चीफ ट्रस्टी,स्थानिक मंडळाचे पदाधिकारी अशी दिग्गज मंडळी व्यासपीठ व सत्काराशिवाय प्रक्षेकांमध्ये बसली होती. तसेच विद्यार्थी सत्कार सामान्य समाज बांधव व भगिनींच्या हस्ते करण्यात आला. प्रथमच गुरव समाजातील सामाजिक कार्यक्रमात पुरुषां पेक्षा महिलांची संख्या जास्त होती.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्माकरजी देवरे यांनी समाजाविषयी आपली जबाबदारी व दायित्व याविषयावर सुंदर मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुणे शांताराम गुरव (करणखेडा), नथ्थुजी गुरव (मारवड), वामनजी गुरव (नंदुरबार), पद्माकरजी देवरे (P.I.), सुमनबाई गुरव (करणखेडा), छायाबाई  गुरव (सुरत), मा.भाऊसो.संजयजी गुरव (नाशिक), आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर गुरव होते. अध्यक्षीय भाषणात उन्नती संस्थेच्या स्थापने पासुन आज पर्यंतच्या इतिहासावर ओझरता कटाक्ष त्यांनी टाकला व वेळात वेळ काढून कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमाकांत हिरालाल शिरपूर(चेअरमन),संजय गुरव लोणखेडा (सचिव), सदस्य राकेश गुरव मारवड (जळगाव), जितेंद्र .गुरव शिरपूर (धुळे), रविंद्र अरुण गुरव तळोदा (नंदुरबार), सौ.विद्याताई राजेंद्र सोनवणे (नाशिक),भावेश रोहिदास गुरव सुरत (गुजरात),हिमेश रघुनाथ गुरव सेंधवा (मध्य प्रदेश),

शिक्षण समिती, गुरव समाज उन्नती संस्था,धुळे यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षण समिती चेअरमन उमाकांत गुरव यांनी केले. याकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माधवराव गुरव (धुळे) संजय गुरव (नाशिक ) हे होते. उन्नती संस्थेचे अध्यक्ष सुरेश गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना उन्नती संस्थाच्या वाटचाली बाबत लेखाजोखा मांडला व पुढील काळात विविध उपक्रम राबविणार आहे त्याविषयी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे आभार शिक्षण समिती चे सेक्रेटरी संजय गुरव सर यांनी मानले.

 

Protected Content