Home Cities अमळनेर बोहरा येथे लम्पी लसीकरण

बोहरा येथे लम्पी लसीकरण

0
24

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यात सद्या पशु धणावर लिम्पि या आजाराने डोके वर काढले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिक ठिकाणी गाव पातळीवर लसीकरण केले जात आहे.

आज दि.१८/९/२०२२रोजी अमळनेर तालुक्यातील मौजे बोहरा येथे रोटरी क्लब व ग्रामपंचायत बोहरा यांच्या सहकार्याने लिम्पी या आजारांवर लस उपलब्ध करून देण्यात आली.

पशुवैद्यकीय दवाखाना मारवड येथील डॉ मुकेश पाटील राहुल बाविस्कर, डॉ. राजेंद्र पाटील हिम्मत पवार यांनी बोहरा गावात येऊन सर्व गावात सुमारे ६०० जनावरांना लिम्पि या आजारांवर प्रतिबंधात्मक लसीकरण केले व जनावरांच्या गोठा स्वच्छ करून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

यावेळी सरपंच सुघीर पाटील संजय पाटील पंढरीनाथ पाटील लखन रत्नापारखी दिपक पाटील जयकर पाटील आदी उपस्थित होते.

आज रोजी गावात कुठेही लिम्पि रोगाचा प्रादुर्भाव नाही असे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी सांगितले आहे.


Protected Content

Play sound