आशादीप महिला वसतिगृहास जिल्हा पेठ पोलीसांनी दिली भेट

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी- येथील गणेश कॉलनी परिसरातील आशादीप महिला वसतिगृहास जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी महिला दिनानिमित्त भेट दिली.

गणेश कॉलनी परिसरातील आशादीप महिला वसतिगृहात सद्यस्थितीत ५ महिला असून त्यांचेशी वसतिगृहातील अडीअडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच वस्तीगृहासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे, याबाबत त्यांना सुरक्षिततेची हमी देण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे व पोलीस उपनिरीक्षक चांदेलकर,महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना तडवी, आशादीप महिला वसतिगृहाच्या अधिक्षिका मयुरी कर्पे, सुरक्षा रक्षक आरती मोरे, आशा पिंजारी आदी उपस्थित होते.

Protected Content