नवी मुंबई विमानतळाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव द्या : गोर सेनेची मागणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । मुंबई विमानतळास माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोर सेनेतर्फे निदर्शने  करून निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनमार्फेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. 

 

नवी मुबंई विमानतळास हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे सलग साडेअकरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे. मा.वसंतरावजी नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीत अत्यंत कठोर निर्णय घेवून नवी मुंबई हे शहर वसविले आहे.शहरामध्ये औद्योगिक विकास झपाटयाने व्हावा म्हणून औद्योगिक विकास महीमंडळाला भरघोष

निधी देवून विकास कामाला गती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून भविष्यात हे शहर देशाचे केंद्रबिदू होणार या दृष्टीने मुंबईचा कायापालट करण्याचे काम त्यांनी केले. जागतिक स्तरावरील अत्यंत महत्वाचे शहर बनवण्यामध्ये मा.वसंतरावजी नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे.  शिवाय हरितक्रांतीचे स्वप्न पाहताना शेतक-यांच्या शेतीला पाणी व वीज मुबलक प्रमाणात मिळावी म्हणून जायकवाडी,उजनीएअप्पर वैनगंगा व पेंच इत्यादी पाण्याचे प्रकल्प व कोराडी पारस, परळी, खापररखेडा, पोफळी व भुसावळ असे विद्युत प्रकल्प उभारले.महाराष्ट्रात हरित क्रांती करून महारष्ट्राला देशात एक नंबरवर आणले. महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे प्रणेते सलग साडेअकरा वर्षे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहून महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभळून देशात महाराष्ट्र राज्याचा गौरव करणा-या महामानवाचे नाव नवी मुंबई विमानतळाला शोभेल व तमाम महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूरांचे व सामान्य जनतेचे स्वप्न साकार होईल.  नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे.हि आमची मागणी आहे.  मागणी मान्य न झाल्यास गोर सेनेच्या वतीने येणा-या काळात वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून नवी मुंबई विमानतळाला मा.वसंतरावजी नाईक यांचे नाव न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/689663585325632

 

Protected Content