पाचोऱ्यातील महाराष्ट्र वाणी युवा मंचची नूतन कार्यकारिणी जाहीर

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा येथील महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र वाणी युवा मंच शाखा, पाचोराची नविन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी अशोक बागड, उपाध्यक्षपदी महेंद्र महालपुरे, खजिनदारपदी रमेश महालपुरे, कार्याध्यक्षपदी प्रा. लक्ष्मण सिनकर, तालुकाध्यक्षपदी प्रकाश येवले, ज्येष्ठ संघटकपदी किरण अमृतकर, ज्येष्ठ सल्लागारपदी प्रा. राजेंद्र चिंचोले यांची निवड करण्यात आली.

कार्यकारिणीच्या सदस्यपदी प्रवीण शेंडे, संजय शेंडे, विशाल ब्राम्हणकार, संदिप महालपुरे, योगेश शेंडे, विवेक ब्राम्हणकार, सुनिल कोतकर, विजय सोनजे, शरद पाटे, गणेश सिनकर, हर्षल सुभाष माकडे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष डी. आर. कोतकर यांनी व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content