…ते देशाचे काय संरक्षण करणार ? : सचिन सावंत

मुंबई प्रतिनिधी | जे आपले स्वत:चे ट्विटर अकाऊंट सुरक्षित ठेवू शकत नाहीत ते देशाचे संरक्षण काय करणार ? अशा शब्दांमध्ये कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींवर टीका केली आहे.

 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हे काही वेळासाठी हॅक केल्याचे समोर आले. अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारे एक ट्विट केले होते. नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र, या ट्विटचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

जे स्वतःचे ट्विटर अकाऊंट वाचवू शकले नाही ते देशाच्या सीमा कशा सुरक्षित ठेवणार असा खोचक सवाल कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपाला केला आहे. चौकीदार अपना ट्विटर अकाउंट नहीं बचा सकता, वह देश की सीमा कैसे बचा सकता हैं? और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है|, असे कॉंग्रेस नेते सचिन सावंत ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

Protected Content