प.वि.पाटील विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याला आपल्या भाषणातून उजळा दिला. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षिका स्वाती पाटील ,कायनात सय्यद, मंगल गोठवाल यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content